‘पुढारी’ एज्युदिशा ऑनलाईन : नामवंत शैक्षणिक संस्थांच्या माहितीसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन | पुढारी

‘पुढारी’ एज्युदिशा ऑनलाईन : नामवंत शैक्षणिक संस्थांच्या माहितीसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शैक्षणिक आकांक्षांना दिशा देण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी’ एज्युदिशा ऑनलाईन 2021 या शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या युगात काळाची गरज असणार्‍या करिअरसंदर्भातील माहितीचा खजिना आणि शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन वाटा यासंदर्भात मार्गदर्शन करणार्‍या नामवंत शैक्षणिक संस्थांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मिळणार आहे. त्यांच्या शैक्षणिक आकांक्षांना दिशा देण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी’ एज्युदिशा ऑनलाईन 2021 या शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे तर सहप्रायोजक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पुणे हे आहेत. 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे. यासाठी www.pudhariexpo.com यावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी दै. ‘पुढारी’च्या वतीने सन 2009 पासून ‘पुढारी एज्युदिशा’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. गतवर्षीपासून सुरू असणार्‍या कोरोनावर उपाययोजनेसाठी लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांकरिता यंदा प्रथमच ऑनलाईन स्वरूपाचे राज्यस्तरीय भव्य प्रदर्शन होत आहे.

कॉलेज कधी सुरू होणार? ऑनलाईन का ऑफलाईन? माझे वर्ष वाया तर नाही जाणार ना? लॉकडाऊनमध्ये एंट्रन्स एक्झाम कशी होणार? मेडिकल, इंजिनिअरिंग की मॅनेजमेंट? डिप्लोमा की डिग्री? असे अनेक प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांना भेडसावत आहेत. यामुळे करिअरचे काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नामांकित शिक्षण संस्था व तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये…

प्रदर्शनात नामांकित, मान्यताप्राप्त विद्यापीठे, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस स्टॉल्स यांचा समावेश असणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नामांकित संस्थांचे कौन्सिलर व तज्ज्ञांकडून घरबसल्या कॉल, चॅट व व्हिडीओ कॉलद्वारे मिळणार आहेत. याशिवाय अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ, मोटिव्हेशनल स्पीकर यांचे लाईव्ह वेबिनार यांच्या माध्यमातून शिक्षणामधील न्यू रिअ‍ॅलिटी समजून घेता येणार आहे. याशिवाय अ‍ॅग्रीकल्चर, एव्हिएशन, हॉटेल मॅनेजमेंट, अ‍ॅनिमेशन, नर्सिंग, होमिओपॅथी, फायर इंजिनिअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी डिस्टन्स लर्निंग, स्पर्धा परीक्षा, आर्टस् – कॉमर्स – सायन्स अशा विविधतेने परिपूर्ण असे हे प्रदर्शन असणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 9545327545.

सहकुटुंब पाहता येणारे प्रदर्शन…

दै. ‘पुढारी’ एज्युदिशा ऑनलाईन शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मालिकेचा लाभ विद्यार्थी व पालकांना घरबसल्या सहकुटुंब घेता येणार आहे. यासाठी www.pudhariexpo.com यावर नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याबरोबरच प्रदर्शनासाठी तयार करण्यात आलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून विनामूल्य नोंदणी करता येणार आहे. मोबाईल, पी.सी., लॅपटॉप, इंटरनेट यांसह स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून एकत्रित घरबसल्या हे प्रदर्शन आणि यातील तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे.

Back to top button