खिद्रापुरात भाविकांना ‘शून्य सावली’चा अनुभव

खिद्रापुरात भाविकांना ‘शून्य सावली’चा अनुभव
Published on
Updated on

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा :  खिद्रापूरच्या (ता. शिरोळ) कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडप आणि त्याच्या ओळंबा रेषेत खाली असणारी रंगशिळा येथे गुरुवारी 'शून्य सावली'चा अनुभव पाहायला मिळाला. त्याचबरोबर सकाळी सूर्योदयावेळी किरणोत्सवही झाला. गाभार्‍यातील शिवलिंगावर किरणांनी अभिषेक केला होता. हाच सुंदर भौमितिक आणि खगोलीय आविष्कार अनुभवण्यासाठी इतर प्रयोगसाधनेही या रंगशिळेवर दत्तवाड येथील विज्ञान शिक्षक भारत सावळवाडे यांनी मांडली होती.

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर मंदिराला पश्चिम महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रातील तसेच धार्मिक स्थळांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे मंदिर पुरातन असल्याने त्याच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेत.'शून्य सावली' ही खगोलशास्त्रीय घटना आहे. प्रत्येक वर्षी दोनवेळा ही घटना घडत असते. सूर्य मध्यान्हाच्या स्थितीत येतो, तेव्हा सूर्याची लंबरूप किरणे पडतात. अशावेळी 'शून्य सावली'चा अनुभव घेता येतो
कोपेश्वर मंदिरात गुरुवारी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी 'शून्य सावली'चा अनुभव अनेकांनी अनुभवला.

'शून्य सावली'चा अनुभव शिरोळ भागात दुपारी 12.22 ते 12.26 या काळात अनुभवता आला. गुरुवारपासून 30 किलोमीटर उत्तरेला म्हणजेच कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली या पट्ट्यात 'शून्य सावली' अनुभवता येईल, अशी माहिती शशांक चोथे, सोपान मोरे यांनी दिली. 'शून्य सावली' अनुभवण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news