जीएसटी अधीक्षक, निरीक्षकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी | पुढारी

जीएसटी अधीक्षक, निरीक्षकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा
50 हजारांची लाच घेताना जयसिंगपूर येथील सेंट्रल जीएसटी परीक्षेत्र 2 चे अधीक्षक महेश नेसरीकर व निरीक्षक अमित कुमार मिश्रा यांना गुरुवारी रात्री सीबीआयने रंगेहाथ पकडले होते. त्यांना शुक्रवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, संशयित आरोपीच्या वकिलांनी संशयितांना जामिनाची मागणी केली. यावर 2 मे रोजी त्यांच्या जामिनासाठी पुन्हा सुनावणी होणार आहे.

Back to top button