कोल्हापूर : पन्हाळ्यात एक कोटी ५० लाखांच्या हरित पट्टा विकास प्रकल्पाचे काम सुरू | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळ्यात एक कोटी ५० लाखांच्या हरित पट्टा विकास प्रकल्पाचे काम सुरू

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा
शासनाची प्रशासकीय मंजुरी घेऊनच काम सुरू केले आहे. या कामाबाबत माजी नगरसेवक व नागरिकांमध्ये गैरसमज सुरू आहे. परंतु त्यामध्ये तथ्य नाही, अशी माहिती पन्हाळा नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने पन्हाळागडावर विविध प्रकारची झाडे लावून पन्हाळा पर्यटकाना आकर्षण करण्याच्या उद्देशाने सहा हजार झाडे लावून हरित पट्टे विकसित करण्याचा प्रकल्प आमदार डॉ. विनय कोरे यांनी सुचविला आहे. त्यानुसार गडावर मोकळ्या जागेत ठिकठिकाणी 13 जागांवर हरित पट्टे विकसित करण्यात येणार आहेत.या साठी सध्या खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे हे काम एका खासगी संस्थेस देण्यात आले असून ही संस्था इचलकरंजीमध्ये काळ्या यादीत घालण्यात आली आहे अशा कंपनीस काम कसे दिले, झाडांच्या सावलीत कसे खड्डे मारले आहेत. 1 कोटी 50 लाखांची पन्हाळ्यात प्रशासनाकडून उधळण होत आहे याची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी नगरसेवक असिफ मोकाशी, दीपक आंबिळढोक, मिलिंद बांदिवडेकर, माजी नगरसेवक चैतन्य भोसले मंदार नायकवडी आदींनी केली आहे. या हरित पट्टा विकास योजनेत कोणत्याही प्रकारची उधळण अथवा मनमानी कारभार नाही शासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती नुसार नगरपरिषद काम करत असून या बाबत फक्‍त ऐकीव चर्चांच्या आधारे तक्रारी केल्या जात आहेत मात्र त्या मध्ये काहीही तथ्य नाही असेही प्रशासक स्वरूप खारगे यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल,कार्यालय अधीक्षक अमित माने उपस्थितहोते. नगरपालिका प्रशासक स्वरूप खारगे यांची माहिती

Back to top button