कोल्हापुरात बँका सकाळी 9 वाजता उघडणार; रिझर्व्ह बँकेचा आदेश जारी | पुढारी

कोल्हापुरात बँका सकाळी 9 वाजता उघडणार; रिझर्व्ह बँकेचा आदेश जारी

कोल्हापूर : ग्राहकांना बँकिंग कामासाठी जादाचा एक तास मिळणार असून बँका आता सकाळी 9 वाजता उघडणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार 18 एप्रिल 2022 पासून बँकांच्या कामकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. यामुळे ग्राहकांना जास्त वेळ बँकिंग सुविधांचा लाभ घेता येणार आहे. कोरोनाच्या साथीमुळे दिवसभरात बँका उघडण्याचे तास कमी करण्यात आले होते. या वेळा आता पूर्ववत करण्यात आल्या आहेत.

आरबीआयच्या वतीने कार्डलेस एटीएममधून व्यवहार करण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. लवकरच ग्राहक यूपीआयद्वारे बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढू शकतील. कार्डलेस म्हणजेच कार्ड न वापरता व्यवहार करणे. यासाठी सर्व बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा यूपीआयद्वारे दिली जाईल. कार्डलेस कॅश व्यवहारात एटीएम पिन ऐवजी मोबाईल पिन वापरला जाईल. यामुळे एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल. कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे व्यवहार सोपे होतील आणि कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे कार्ड क्लोनिंग, कार्ड चोरी आणि इतर अनेक प्रकारची फसवणूक टाळता येणार आहे.

Back to top button