कोल्हापूर : कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करणार | पुढारी

कोल्हापूर : कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करणार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्याचेे नियोजन महावितरणने केले आहे. यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साडेतीन लाखांहून अधिक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. कृषी वाहिन्यांवर नियमित आठ तास वीजपुरवठा देण्याचे प्रयत्न आहेत. आकस्मिक स्थितीत भार नियमनाची गरज लागल्यास कृषी वीज पुरवठ्याच्या नियोजित वेळापत्रकाच्या आठ तासांतील सुरुवातीस किंवा शेवटच्या काही कालावधीकरिता वीज बंद करून उर्वरित कालावधीत अखंडितपणे वीज पुरवठा केला जाणार आहे. यामुळे कृषी पंपधारकांची गैरसोय टळणार आहे.

वाढता उष्मा, कोळसा टंचाई, वीज निर्मिती संचाची देखभाल दुरुस्ती या पार्श्वभूमीवर वाढती मागणी व अपुरा पुरवठा यामुळे काही ठिकाणी भारनियमन करावे लागत आहे. कोल्हापूर, सांगलीत चांगली वसुली कोल्हापूर, सांगलीतील बहुतांश भागात वीज बिल वसुलीचे प्रमाण चांगले असून वीजहानीही कमी आहे.

Back to top button