कोल्हापूर : पन्हाळा मुख्य मार्गावरील दुचाकी वाहतूक चार दिवसासाठी बंद | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळा मुख्य मार्गावरील दुचाकी वाहतूक चार दिवसासाठी बंद

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा : किल्ले पन्हाळगडावरील मुख्य रस्ता दुचाकीसाठी चार दिवस बंद करण्यात आला आहे. मुख्य रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी मोठे नळ टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी रस्ता बंद करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पन्हाळा शाखा अभियंता अमोल कोळी यांनी सांगितले.

पन्हाळा  मुख्य रस्ता बांधणी पूर्ण होत आली असून या रस्त्यावर नागझरीकडून तसेच मंगेशकर बंगल्याकडून वाहून येणारे पावसाचे पाणी रस्त्यात मुरू नये, म्हणून मोठे नळ रस्त्यात घातले जात आहेत. तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी देखील उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिले आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. नळ घालण्यासाठी चार दरवाजा परिसरात मोठी चर काढण्यात आली असल्याने दुचाकी वाहतूक व पायी येण्यासाठी असलेला रस्ता बंद झाला आहे. दुचाकी वाहतूक राक्षीमार्गे  तीन दरवाजा मार्गावर वळवण्यात आली आहे. तर चारचाकी वाहतूक पर्यायी रस्त्यावरून रेडेघाटी मार्गाने सुरू आहे. रेडेघाटी रस्ता देखील धोकादायक बनला असून हा रस्ता कायमस्वरूपी सिमेंट अथवा डांबरी करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button