प्रमुख धरणांत ५४ टक्के पाणीसाठा | पुढारी

प्रमुख धरणांत ५४ टक्के पाणीसाठा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणे निम्म्याहून अधिक भरलेली आहेत. या धरणांत सरासरी 54.62 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी हेच प्रमाण 51.33 टक्के होते. गतवषीर्र्च्या तुलनेत यावर्षी या कालावधीत धरणांत 2.27 टी.एम.सी.जादा पाणीसाठा आहे.

गतवषीर्र् झालेल्या पावसामुळे धरणांत चांगला पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी परतीचा पाऊसही चांगला झाला. यामुळे धरणांतून शेतीसाठी पाण्याची मागणी उशिरा झाली. सध्या एप्रिल महिन्यातही वळीव पावसाने चांगली हजेरी लावली. परिणामी धरणांतील पाणीसाठा यावर्षीही समाधानकारक राहिला आहे.

राधानगरी धरणात सध्या 53 टक्के भरलेले आहे. गतवषीर्र् ते याच कालावधीत 46 टक्के भरलेले होते. दूधगंगा (काळम्मावाडी) धरण यावर्षी 52 टक्के भरलेले आहे. गतवषीर्र् हेच प्रमाण 43 टक्के इतके होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वारणा धरणात मात्र कमी पाणीसाठा आहे. वारणा धरण गेल्यावर्षी आजअखेर 49 टक्के भरलेले होते, यावर्षी ते 46 टक्के भरलेले आहे.

पाणीसाठ्याचे नियोजन सुरू

यावर्षीही चांगल्या पावसाचा अंदाज आहेत. त्यामुळे जूनच्या मध्यापासूनच पाऊस सुरू होईल, अशी शक्यता आहे. तरीही जून अखेरपर्यंत पिण्यासाठी पाण्याचा विचार करून धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गतवर्षी जिल्ह्यात आजवरची सर्वाधिक गंभीर पूरस्थिती झाली होती. मात्र, त्यावेळी जिल्ह्यातील धरणे भरलेलीही नव्हती, तसेच कोणत्याही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नव्हता. तरीही धरणातील पाणीसाठा कमी करणे आणि पाऊस सुरू झाल्यानंतर भरण्याबाबतचे नियोजन जलसंपदा विभागाने सुरू केले आहे.

पाणीसाठा

Back to top button