सतेज पाटील निष्क्रिय गृह राज्यमंत्री : चित्रा वाघ | पुढारी

सतेज पाटील निष्क्रिय गृह राज्यमंत्री : चित्रा वाघ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. मात्र, त्या अत्याचाराबद्दल मौन बाळगणारे सतेज पाटील हे निष्क्रिय गृह राज्यमंत्री आहेत, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली.भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ शुक्रवार पेठेतील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पदाचा गैरवापर करून कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय दहशत निर्माण करण्याऐवजी, त्यांनी गुंड आणि गुन्हेगारांवर दहशत निर्माण करून दाखवावी, असा टोलाही वाघ यांनी गृह राज्यमंत्री पाटील यांना लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात गुंडगिरी, भ—ष्टाचार, खंडणी, महिलांवरील अत्याचार वाढले. त्याबद्दल गृह राज्यमंत्र्यांनाही जाब विचारला पाहिजे. कोल्हापुरातील महिला गृह राज्यमंत्र्यांना धडा शिकवतील, असा इशारा वाघ यांनी दिला.

वाघ म्हणाल्या, सतेज पाटील यांनी जाणीवपूर्वक थेट पाईपलाईन योजना रखडत ठेवून, लोकांना गाजर दाखवले. कोल्हापूरवर टोल लादून टोलची पावती फाडून, जनतेच्या जखमेवर मीठ चोळले. त्यामुळे जनतेनेच या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि सतेज पाटील यांना कायमचा धडा शिकवावा. यावेळी अरुंंधती महाडिक यांचे भाषण झाले.

Back to top button