कोल्हापूर : जयश्री जाधव यांच्या विचारे माळ, सदर बाजार येथील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

कोल्हापूर : जयश्री जाधव यांच्या विचारे माळ, सदर बाजार येथील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ सदर बाजार, विचारेमाळ प्रभागात काढलेल्या पदयात्रेत जल्लोषी प्रतिसाद मिळाला. पदयात्रेदरम्यान महाविकास आघाडी आणि जयश्री जाधव यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचे झेंडे, स्कार्फ, टोप्या व कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे उत्साही वातावरण झाले.

शाहू कॉलेज येथून पदयात्रेला सुरुवात झाली. विचारे माळ, सदर बाजारमधील सर्व सोसायट्यांमधून पदयात्रा काढण्यात आली. कोरोनाच्या संकट काळात स्व. चंद्रकांत जाधव यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आम्हाला दिलासा दिला. अण्णांनी या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना या परिसरातून साथ देऊ, असा विश्वास माजी महापौर अ‍ॅड सूरमंजिरी लाटकर यांनी व्यक्त केला.

माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, शिवसेनेचे रवी चौगुले, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, अशोक भंडारे, मंगल चव्हाण, महेश जाधव, विशाल चव्हाण, बाबासाहेब ढोकळे, कैलास गौडदाब, तुकाराम तेरदाळकर, दिनमोहम्मद शेख, अझर फकीर, मेहमूद पठाण, राजू येडगे, समशेरसिंह कलानी, दिलीप पोवार, राजाराम धनवडे, दिपाली देशमुख, जहिदा मुजावर, विकास सावंत, कैलास कांबळे, अब्दुल फकीर, रफिकशेख, आयुब मुल्ला, दिलीप भंडारी, विनोद भोसले, मंगलताई ढोकळे, अफजल फकीर, अर्जुन सवईसर्जे, विजय यादव, शम्हीसिंग दुधानी, धनसिंग बाबरी, वसंत वडार, राजू येडगे, अमर हेगडे, सदाशिव कांबळे, हिंदुराव माने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Back to top button