कोल्हापूर : रिक्षा सुंदरींचा थाटच न्यारा!

कोल्हापूर : रिक्षा सुंदरींचा थाटच न्यारा!
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
एअर कंडीशनर… मोबाईल चार्जर… वृत्तपत्र… एलईडी टीव्ही… सोलर… साऊंड सिस्टीम… रेफ्रिजरेटर… अद्ययावत विद्युत यंत्रणा हे वर्णन एखाद्या आलिशान फ्लॅटचे नव्हे, तर ही सर्व वैशिष्ट्ये एका रिक्षात सामावली आहेत. शिवाजी पेठेत रविवारी पार पडलेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेच्या निमित्ताने वैविध्यपूर्ण रिक्षांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत संकेत पोवार यांच्या रिक्षाने महाराष्ट्र रिक्षा सुंदरीचा, तर बेळगावच्या दाऊद सय्यद यांच्या रिक्षाने कोल्हापूर रिक्षा सुंदरीचे बक्षीस पटकावले.

शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळाच्यावतीने 22 व्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूरसह पुणे, कराड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव येथील रिक्षा मालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. दोन गटांत ही रिक्षा सौंदर्य स्पर्धा पार पडली. सामाजिक संदेश, अत्याधुनिकतेची जोड, प्रवाशांबद्दलची आत्मीयता अशी अनेक वैशिष्ट्ये या स्पर्धेच्या निमित्ताने समोर आली.

2018 च्या आतील गटात दाऊद सय्यद (बेळगाव), राहुल कोरे (सोलापूर), अस्लम शेख (कोल्हापूर) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. तर राजू खतीब यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. 2018 ते 2022 या गटात संकेत पोवार (कोल्हापूर), संग्राम शिंदे (कराड), विकी कोराळे (सोलापूर) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले. तर रवींद्र रहाटे (संगमेश्वर) यांची रिक्षा उत्तेजनार्थ आली. पंच म्हणून विलास गवळी, मनोज दरेकर यांनी काम पाहिले. बक्षीस समारंभासाठी मालोजीराजे, पृथ्वीराज महाडिक, महेश जाधव, आयोजक राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, मोहन बागडी, रितेश जाधव उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news