डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट | पुढारी

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ना. थोरात यांना शाल, श्रीफळ व अंबाबाई देवीची मूर्ती देऊन डॉ. जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दै. ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव उपस्थित होते. डॉ. प्रतापसिंह जाधव व बाळासाहेब थोरात यांनी परस्परांना गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

बाळासाहेब थोरात दोन दिवस कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी डॉ. जाधव यांची निवासस्थानी भेट घेतली. यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. महसूल विभागांतर्गत नव्याने करण्यात आलेल्या बदलांची माहिती ना. थोरात यांनी डॉ. जाधव यांना दिली. डॉ. जाधव यांनी त्याबद्दल थोरात यांचे मनापासून अभिनंदन केले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण बदलाला शुभेच्छा दिल्या.

त्यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी आमदार मोहन जोशी, रणजितसिंह देशमुख, बाजीराव खाडे, तौफिक मुल्लाणी आदी उपस्थित होते.

Back to top button