कोल्हापूर : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १५ कोकरांचा मृत्यू

कुंभोजमधील घटना; १ लाख २५ हजारांचे नुकसान
Kolhapur wild animal attack
१५ कोकरांचा मृत्यू
Published on
Updated on

कुंभोज : येथील पाझर तलाव परिसरात तरससदृश वन्य प्राण्यांनी शनिवारी (दि.५) रात्री केलेल्या हल्ल्यात रंगराव पुजारी यांच्या ९ कोकरांचा व सहदेव पालखे यांच्या ६ कोकरांचा असे एकूण १५ कोकरांचा मृत्यू झाला. यामध्ये रंगराव पुजारी व सहदेव पालखे यांचे अंदाजे १ लाख २५ हजारांचे नुकसान नुकसान झाले आहे.

Kolhapur wild animal attack
मुंबई : चेंबूर येथील इमारतीला भीषण आग, 5 जणांचा होरपळून मृत्यू

याबाबत माहिती अशी; रंगराव पुजारी व सहदेव पालखे यांचे मेंढरे खतासाठी गट नंबर १४९८ मधील मारुती घोदे यांच्या शेतात खतासाठी बसवण्यात आली होती. शनिवारी रात्री वाघर मध्ये ठेवण्यात आलेल्या कोकरांच्यावर तरससदृश वन्य प्राण्यांनी हल्ला करून १५ कोकरे ठार केली. या घटनेमुळे रंगराव पुजारी व सहदेव पालखे यांचे कुटुंबिय खचून गेले आहेत. या घटनेची माहिती रंगराव पुजारी यांचा मुलगा सुदर्शन पुजारी यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, शिरोळ तालुकाध्यक्ष दादासो गावडे, जिल्हा संघटक पिंटू गावडे यांना कळवली. यावेळी संजय वाघमोडे यांनी या घटनेची माहिती वन अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांना तात्काळ कळवून अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. वनरक्षक मंगेश वंजारे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय डॉ.आर बी जंगम यांनी पंचनामा केला. यावेळी कोणत्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे ही घटना घडली हे स्पष्ट झाले नाही. यासाठी घटनास्थळी वनविभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

Kolhapur wild animal attack
Jalgaon | गरबा खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news