कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत ३८० कोटी | पुढारी

कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत ३८० कोटी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत 31 मार्चअखेर तब्बल 380.63 कोटी जमा झाले. 2021-22 या आर्थिक वर्षात प्रशासनाला 472.92 कोटींचे टार्गेट होते. त्यापैकी 80.48 टक्के वसूल करण्यात यश आले. गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे 73 कोटी जादा महसुलाची वसुली झाली आहे. यात नगररचना विभागातील करासह विविध करांचा समावेश आहे.

नगररचना विभागाला यावर्षी 44.68 कोटीचे उद्दिष्ट दिले होते. नगररचना विभागाने 78.30 कोटी महसूल जमा केला आहे. मागील वर्षी या विभागाने 21.49 कोटी महसूल जमा केला होता. स्थानिक संस्था कर विभागाला 147 कोटीचे उद्दिष्ट होते. यापैकी 163.69 कोटी महसूल जमा झाला आहे. इस्टेट विभागाला 31.52 कोटीचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी 3.54 कोटी महसूल जमा झाला आहे. परवाना विभागाला 4.15 कोटीचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी 2.14 कोटी महसूल जमा झाला आहे. आरोग्य विभागाला 2.50 कोटीचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी 2.34 कोटी महसूल जमा झाला आहे.

शहर पाणीपुरवठा विभागाला 73.31 कोटीचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी 45.19 कोटी महसूल जमा झाला आहे. अग्निशमन विभागाला 1.28 कोटीचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी 98.60 लाख महसूल जमा झाला आहे. इतर विभागांना 28.26 कोटीचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी 62.04 कोटी महसूल जमा झाला आहे. सन 2021-22 साली दिलेल्या 472.92 कोटी महसुलापैकी 380.63 कोटी महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी 307.33 कोटींचे उद्दिष्ट होते.

Back to top button