देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; एक ठार, तिघेजण गंभीर

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; एक ठार, तिघेजण गंभीर

मुरगूड : मुरगूडहून सौंदत्तीला यल्लमा देवदर्शनासाठी जाताना हुक्केरी जवळ मुरगूडच्या डॉ. संजय जयसिंग चौगले यांच्या वॅगनआर मोटारचा अपघात होऊन ते जागीच ठार झाले तर त्यांच्या कुटुंबातील अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडला.

अपघातासंबंधी अधिक माहिती अशी, मुरगूडमधील जनावरांचे डॉक्टर संजय जयसिंग चौगले हे पत्नी व दोन नातेवाईकांसोबत सौंदत्तीला यल्लमा देवदर्शनासाठी मुरगूडहून सकाळी 6 वाजता आपल्या वॅगनआर मोटार गाडीने जात होते. हुक्केरीजवळ त्यांच्या गाडीच्या आडवे अचानक कुत्रे आले. त्याला चुकविण्याच्या प्रयत्नात डॉ. संजय चौगले यांचा गाडीवरील ताबा सुटला व रस्त्याच्या बाजूला खोल भागात गाडीने तीन ते चार पलट्या खात गाडी एका झाडावर आदळली.

यात डॉ.चौगले (वय 57) हे जागीच ठार झाले तर गाडीतील त्यांची पत्नी सविता (50), नातेवाईक अनिल ईश्वरा गुजर (58) व सौ. विजया सदाशिव सूर्यवंशी (60) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताने मुरगूडवर शोककळा पसरली. डॉ. संजय चौगले यांचा मृतदेह सायंकाळी मुरगूड येथे आणण्यात आला. रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताने चौगले कुटुंबाला मोठा धक्का बसला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news