अभिजित बिचुकले ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये अवतरले!

अभिजित बिचुकले ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये अवतरले!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ येईल तशी संख्या वाढू लागली आहे. या पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले (सातारा) व करुणा शर्मा यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू हेाती. परंतु ही चर्चा आता हळूहळू मागे पडू लागली आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतील आपला उमेदवार जवळपास निश्चित केला आहे.

केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या करुणा शर्मा तसेच छोट्या पडद्यामुळे चर्चेत राहिलेल्या अभिजित बिचुकले यांनी या पोटनिवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news