कोल्हापूर : लज्जतदार, चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेत मनसोक्त शॉपिंगची संधी उपलब्ध करून देणारा 'पुढारी कस्तुरी क्लब' आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल आता गडहिंग्लजमध्ये होणार आहे. चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंट, होम डेकोर, आयुर्वेदिक प्रॉडक्टस्, यांच्याबरोबर शाकाहारी आणि मांसाहारी नानाविध पदार्थ फेस्टिव्हलच्या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनासाठी अर्जुन ऑईल हे मुख्य प्रायोजक म्हणून लाभले आहेत.
खाद्यपदार्थांची मेजवानी
प्रदर्शनात खाद्यपदार्थांची मेजवानी असून खास शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची रेलचेल असणार आहे. मांसाहारीमध्ये अस्सल कोल्हापुरी झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा, मटण बिर्याणी, वडा कोंबडा, चिकन बिर्याणी, कबाब, चिकन लॉलीपॉप, तंदूर, चिकन 65, फिश फ्राय, तळलेले बोंविंग, सुरमई, पापलेट तर शाकाहारी पदार्थांमध्ये पावभाजी, सँडविच, झुणका-भाकर, गोबी मंच्युरियन, व्हेज पुलाव या पदार्थांचा समावेश असणार आहे.
खरेदी आणि खाद्यप्रेमींसाठी हे फेस्टिव्हल पर्वणी ठरणार असून या फेस्टिव्हलअंतर्गत व्यावसायिक व खाण्याचे मिळून दीडशेहून अधिक स्टॉल्स असणार आहेत. शिवराज कॉलेज मैदान, शासकीय विश्रामगृह शेजारी, वडरगे रोड गडहिंग्लज येथे 25 ते 29 मार्च या कालावधीत फेस्टिव्हल होणार असून खरेदीसोबत चमचमीत पदार्थांवर ताव मारण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे.
गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था या प्रदर्शनात करण्यात आली असून प्रदर्शनातील स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : कंझ्युमर स्टॉल – अमोल – 9765566377, प्रणव – 9404077990, सनी 9922930180, फूड स्टॉलसाठी – 9096853977, 9423539561, 8483926989 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.
गृहोपयोगी वस्तूंसाठी भव्य मंडप
चारचाकीपासून ते फर्निचरपर्यंत, आटा चक्की, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, फ्रीज, वॉशिंग मशिन, एलईडी टीव्ही, कपडे, मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, ब्रँडेड शूज, इमिटेशन ज्वेलरी यांसारखे असंख्य स्टॉल प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतील.