कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबा मंदिरांत आता लहान मुलांनाही प्रवेश | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबा मंदिरांत आता लहान मुलांनाही प्रवेश

कोल्हापूर, पुढारी वृत्‍तसेवा : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर व दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात लहान मुलांना दर्शनासाठी परवानगी देण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. त्याची शुक्रवारपासून अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे दोन वर्षांनंतर भाविकांनी सहकुटुंब दर्शनाचा लाभ घेतला.

दरम्यान, दर्शनासाठी ई-पासची सक्ती कायम ठेवण्यात आली असून, लहान मुलांनाही ई-पास आवश्यक असल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

मंदिराच्या पूर्व दरवाजातून प्रवेश आणि दक्षिण दरवाजातून बाहेर जाण्याचा मार्ग कायम ठेवण्यात आला आहे. एका तासात 2 हजार भाविकांना थेट, तर 2 हजार भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. दिवसाला 60 हजार भाविकांना दर्शन मिळेल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.

थेट दर्शन आणि मुखदर्शन यासाठी वेगवेगळ्या रांगा असतील. महाद्वार चौक ते गरुड मंडप मुखदर्शनासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था लवकरच केली जाणार आहे.

Back to top button