कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्या | पुढारी

कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्या

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : अंशतः अनुदानित 20 टक्के व 40 टक्के अनुदान घेणार्‍या त्रुटी पूर्तता केलेल्या व अघोषित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवा संरक्षण मिळावे आदी मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी गुरुवारपासून (दि. 3) कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

गेली 20 वर्षे विनाअनुदानित शिक्षकांचा अनुदानासाठी संघर्ष सुरू आहे. आश्वासने देऊन शासन चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ आंदोलन पुकारले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत माघार नाही, असा इशारा राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे. आंदोलनात प्रकाश पाटील, गजानन काटकर, शिवाजी खापणे, भानुदास गाडे, राजेंद्र भोरे, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे, स्मिता उपाध्ये सहभागी झाले होते.

Back to top button