युक्रेन : तब्बल 18 तासांच्या संघर्षमय प्रवासानंतर आर्या कोल्हापुरात

युक्रेन : तब्बल 18 तासांच्या संघर्षमय प्रवासानंतर आर्या कोल्हापुरात
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : बकोव्हेनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ते बुकारेस्ट व्हाया तेहरान, पाकिस्तानमार्गे मुंबई अशा 18 तासांच्या संघर्षमय प्रवासानंतर अखेर आर्या चव्हाण कोल्हापुरात सुखरूप परतली. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या थरारक, कटू अनुभवांचे तिने कथन केले.

युक्रेनमधून परतल्यावर सोमवारी आर्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आई नेहा चव्हाण, वडील नितीन चव्हाण यांच्यासह फिनेस ओव्हरसीज एज्युकेशनचे जयंत पाटील उपस्थित होते. आर्याचे लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण चांगले मिळत असल्याचे मित्रांकडून समजल्यावर माहिती गोळा केली.

चेनव्हित्सी शहरातील बकोव्हेनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत डिसेंबर 2021 मध्ये एमबीएस प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला. तेथे गेल्यावर युक्रेन भाषेची अडचण आली, शिक्षकांनी यासाठी खूप मदत केली. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचे आईने फोनवरून सांगितले. त्यावेळेस सायरनचे आवाज ऐकून भीती वाटली.

प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्याच्या दिवशी तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारतीय दूतावास कार्यालय, मित्र-मैत्रिणींनी मदत केली. फॉर्म भरून घेतले. पहिल्याच यादीत नाव होते. कॉलेजमधून बसने दूतावासाच्या बसने युक्रेन सीमेपर्यंत नेले. तेथे कागदपत्रांची तपासणी केली. तत्काळ त्यांना व्हिसा बनवून देण्यात आला.

रोमानियाची सीमा ओलांडल्यावर बुकारेस्ट विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी आठ तासांचा प्रवास केला. एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दाखल झाले. त्यावेळी सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे आर्या म्हणाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news