कोल्हापूरः ‘गुडघे-कंबरदुखी’ उपचार शिबिरास प्रारंभ

कोल्हापूरः ‘गुडघे-कंबरदुखी’ उपचार शिबिरास प्रारंभ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवाः वयोमानानुसार शारीरिक बदलांमुळे ज्येष्ठ नागरिकांना गुडघे व सांधेदुखीच्या व्याधींना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तिंकरिता मोफत उपचार शिबिरास गुरुवारी प्रारंभ झाला.दैनिक 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन, अरिहंत जैन फाऊंडेशन, पार्श्‍वनाथ को. ऑप. बँक लिमिटेड, कोल्हापूर, संभवनाथ जैन श्‍वेतांबर संघ, गुजरी यांच्या संयुक्‍त विद्यमाने दि. 6 फेब—ुवारी पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे शिबिर शाहूपुरी, तिसरी गल्‍ली येथील पार्श्‍वनाथ बँकेच्या मुख्य कार्यालयात सुरू आहे.

दैनिक 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्या हस्ते व पार्श्‍वनाथ बँकेचे चेअरमन विनोद मेहता यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती व राजर्षी शाहू यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा पूनम शहा, संभवनाथ संघाचे नरेंद्र ओसवाल, राजेश निंबजिया, अरिहंतचे दिलीप गुंदेशा, अशोक ओसवाल व बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरात उदयपूर येथील तज्ज्ञ थेरपिस्ट आर. सिंघानिया व डॉ. संदीप यांनी तपासणीसह उपचारासाठी मार्गदर्शन केले. जयेश ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. अभय गांधी यांनी आभार मानले. (कोल्हापूर शिबिर)

राजर्षी शाहूंच्या स्मृतींना उजाळा

(कोल्हापूर शिबिर) उद्घाटनानंतर मार्गदर्शक करताना दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील म्हणाले, यंदाचे वर्ष लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीचे वर्ष आहे. राजर्षी शाहूंनी व्यापारपेठांची निर्मिती करण्याबरोबरच स्वखर्चाने मिरज -कोल्हापूर रेल्वेसेवा सुरू केली. राजर्षींनी दूरद‍ृष्टीने उभारलेल्या शाहूपुरीत हा आरोग्यदायी उपक्रम भूषणावह आहे. (कोल्हापूर शिबिर)

हेही वाचलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news