चिनी माल : वर्षात ७० हजार कोटींच्या चिनी मालावर बहिष्कार

चिनी माल : वर्षात ७० हजार कोटींच्या चिनी मालावर बहिष्कार
Published on
Updated on

कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले : चिनी माल बहिष्कार टाकण्याच्या सूचनेनुसार कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने देशभरातील व्यापार्‍यांना चिनी माल बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. याला व्यापार्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. व्यापार्‍यांनी आयात बंद केल्याने चिनी बाजारपेठेला वर्षभरात सुमारे 70 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकल फॉर वोकल व आत्मनिर्भर भारत हे दोन उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. चीनने आपल्या देशातील विविध धार्मिक सणाच्या निमित्ताने वापरात येणार्‍या वस्तूंची निर्मिती करून भारतीय बाजारपेठ काबीज केली होती.

गणेशोत्सवातील डेकोरेशनच्या विविध साहित्यांपासून दसरा, दिवाळीतील फटाकेही चीनमधून आयात करण्यात येत होते. याशिवाय किराणा, चप्पल, खेळणी, भेटवस्तू, काचेच्या वस्तू अशा अनेक चिनी वस्तूंना भारतात मोठी मागणी होती.

कॅट संघटनेने आवाहन केल्यानंतर या सर्व मालावर बहिष्कार घालण्यास व्यापार्‍यांनी सुरुवात केली. या वस्तूंचे आपल्या देशातील उत्पादन वाढवण्याचे आवाहनही कॅट संघटनेने केले. चिनी मालाची शंभर टक्के आयात थांबवणे शक्य नसले तरी शक्य तेवढी आयात बंद करण्यात आली.

2001 मध्ये चिनी वस्तूंची भारतातील आयात 2 बिलियन डॉलर रकमेची होती, ती 70 बिलियन डॉलरवर पोहोचली होती. वीस वर्षांत चीनच्या आयात मालात 3500 पटीने वाढ झाली होती. इलेक्ट्रॉनिक्स, फौंड्री, वाहन उद्योग, मोबाईल क्षेत्रात चिनी मालाचे वर्चस्व कायम आहे. अनेक क्षेत्रांत कच्च्या मालावर आपल्याला चीनवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शंभर टक्के आयात थांबवणे शक्य नसले तरी चिनी उद्योगांना भारतीय बाजारपेठांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे 70 हजार कोटींचा फटका बसला आहे.

1 लाख कोटीचे उद्दिष्ट : पाटील

चिनी मालावर बहिष्काराचे अभियान अधिक व्यापक प्रमाणावर राबवण्यात येणार आहे. पुढील वर्षभरासाठी सुमारे 1 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या चिनी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी व्यापार्‍यांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैयैशील पाटील यांनी सांगितले. यासाठी 40 हजार व्यापारी संघटनांच्या 8 कोटी व्यापार्‍यांपर्यंत हे अभियान पोहोचवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news