सिंधुदुर्ग : समुद्राला उधाण, किनारपट्टीवर उंच लाटा; पर्यटकांची मात्र स्टंटबाजी

सिंधुदुर्ग : समुद्राला उधाण, किनारपट्टीवर उंच लाटा; पर्यटकांची मात्र स्टंटबाजी

मालवण; पुढारी वृत्तसेवा :  बिपरजॉय वादळामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. भरतीच्या वेळी समुद्र खवळलेला दिसून आला. मालवण समुद्र किनारी देखील मोठमोठ्या लाटा उसळत असून १३ जूनपर्यंत मालवण ते वसईच्या किनारपट्टी भागात ३.५ ते ५.१ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे येत्या काळात कोणीही समुद्रात प्रवेश करू नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मात्र याच खवळलेल्या समुद्रकिनारी पर्यटक स्टंटबाजीचा खेळ करताना निदर्शनास येत आहेत.

प्रशासनाकडून तसेच स्थानिकांकडून समुद्रकिनाऱ्यांपासून दूर रहा अशा सूचना मिळून देखील पर्यटक आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. मागील दोन चार दिवसांपासून सिंधुदुर्गची किनारपट्टी खवळली आहे. पावसाचा अद्याप जोर नसला तरीही बिपर जॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्राला उधाण आले आहे. उंच लाटांमुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news