सिंधुदुर्ग : तेल गळतीमुळे सिंधुदुर्गसह गोव्यातील किनारे होणार बाधित

सिंधुदुर्ग : तेल गळतीमुळे सिंधुदुर्गसह गोव्यातील किनारे होणार बाधित
Published on
Updated on

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : विजयदुर्ग ते देवगड दरम्यान अपघातग्रस्त झालेल्या 'पार्थ' या तेलवाहू जहाजामधून तेल गळतीस सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जहाजातून होणारी तेल गळती ही घटना घडलेल्या ठिकाणापासून दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेला पसरणार आहे. त्यामुळे सदरची तेलगळती झाल्यास देवगड, मालवण, वेंगुर्ला या किनार्‍याबरोबरच गोवा राज्यातील किनारे देखील बाधित होणार असल्याची माहिती राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था, गोवा यांचे वैज्ञानिक डॉ. सुनील यांनी बैठकीत दिली.

विजयदुर्ग ते देवगड दरम्यान 40 ते 45 वाव पाण्यात 'पार्थ' हे 101 मी. लांबीचे तेलवाहू जहाज 16 सप्टेंबर रोजी अपघातग्रस्त झाले आहे. सदरची तेल गळती अपघातग्रस्त झालेल्या जहाजापासून 8 चौ. कि.मी. परिसरात झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात अपघातग्रस्त पार्थ तेलवाहू जहाजाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ, पोलिस निरीक्षक सागरी सुरक्षा बल अनिल जाधव, वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे, देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सदर तेल गळती थांबविण्यासाठी कोस्ट गार्ड रत्नागिरी यांच्या यंत्रणेकडून या भागात 250 लिटर ऑईल स्पील डीस्परसंट (जडऊ) ची फवारणी हेलिकॉप्टर मधून करण्यात आलेली आहे. सदर तेल गळतीच्या ठिकाणी झअछऊख क्लबच्या स्वच्छता टीम कडून देखील आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. सदर तेल गळतीच्या अनुषंगाने कोस्ट गार्ड रत्नागिरी यांच्याकडून ऑईल स्पील डीस्परसंटची फवारणी कोस्ट गार्डच्या जहाजाकडून सदर ठिकाणी 24*7 देखरेख अशा उपाययोजना सुरु आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news