दीपक केसरकर
दीपक केसरकर

सिंधुदुर्ग : आमचा एकही आमदार परतीच्या वाटेवर नाही! दीपक केसरकरांचा दावा

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर आहेत, असे कोण सांगत असेल तर ते त्यांचे दिवास्वप्न आहे. आम्ही गुवाहाटीत असतानाही असे दावे वारंवार करण्यात आले होते. उलट गुवाहाटीतून मुंबईत आल्यावर आणखी एक आमदार आमच्या गटात सहभागी झाला, असा टोला शिंदे गटाचे मुख्य प्रवक्‍ते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. शिंदे गटातून आता एकही आमदार माघारी परतणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

हॉटेल मँगो टू येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ना. केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपले आहेत ते आमदार सांभाळावेत, नाहीतर एक आमदार अगोदरच गेला आहे, ते उर्वरीत कधी जातील हे तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे चुकीची वक्‍तव्ये करू नका, असा सल्ला दिला. शिक्षकांकडे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी आहे. यामुळे राष्ट्रीय जबाबदारी सोडून त्यांच्याकडे अन्य कामांची अतिरिक्‍त जबाबदारी दिली जात असेल तर त्याबद्दल आपण निश्‍चितच पुनर्विचार करू, असे त्यांनी सांगितले. यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन तसा अध्यादेश काढला जाईल, चुकीच्या पद्धतीने आदेश देणार्‍यांची चौकशी केली जाईल.

आ. प्रशांत बंब यांनी केलेल्या विधानाबाबत मंत्री केसरकर यांना विचारले असता याबाबत आपण अद्याप माहिती घेतली नसल्याचे ते म्हणाले. माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नंदू शिरोडकर, नंदू गावडे आदी उपस्थित होते.

logo
Pudhari News
pudhari.news