रत्नागिरी : या पुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच

रत्नागिरी : या पुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी राज्यात भक्कम आहे. ही आघाडी अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने दि. 15 मार्चला सर्व घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढण्याच्या सूचना प्रत्येक पक्षांचे नेते करतील. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा? ? निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवल्या जाणार असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी येथे स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे राज्यभर मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोकणातही मेळावा घ्यावा अशी सूचना आपण ना.अजित पवार यांना केली आहे. त्यामुळे कोकणातील कोणत्याही एका जिल्ह्यात हि सभा होईल. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ, नुकत्याच झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये जनतेने भाजपला त्यांची जागा दाखविली आहे. तर भाजपने शिंदे गटाला एकही जागा न देवून त्यांना ही त्यांची जागा दाखवून दिल्याचा टोला खा. तटकरे यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बदलताना एकमेकांचे पदाधिकारी दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. महाविकास आघाडी भक्कम होण्यासाठी काही ठिकाणी या गोष्टी आवश्यक असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांनी शिवसेना फोडली असा आरोप शिंदे गटाचे स्वयंमघोषित प्रवक्त्यांनी केला आहे. त्यांनी स्वत:ला आरशात पहावे. आपल्याला आमदाराकी कोणी दिली याचे आत्मपरिक्षण करावे. आपले राजकिय अज्ञान किती आहे, हे राज्यातील जनतेला ते दाखवत असावेत .सद्या ते राजकिय विश्लेशक झाले आहेत.? ? त्यातूनच त्यांची पोपटपंची सुरु असल्याचा आरोप खा. तटकरे यांनी शिंदे गटाच्या प्रवक्त्यांवर केला आहे.

राजकारणात कोणी कोणावर बोलावे, याला तारतम्य लागते. ते शिंदे गटाच्या प्रवक्त्यांकडे राहिलेले नाही. यातूनच त्यांचा राजकिय अज्ञानपणा पाहण्याची संधी राज्यातील जनतेला मिळत आहे. त्यांच्या टिकेचा महाविकास आघाडीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे खा.तटकरे यांनी सांगितले. अर्थसंकल्पा पेक्षा पुरवणी मागणी जास्त आहेत.मग यांनी अर्थसंकल्प कसला तयार केला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यावर कर्जाचा बोजा किती आहे. राज्यावर साडेसहा हजार कोटींचे कर्ज असताना, सरकारकडे निधी किती आहे व अर्थसंकल्प कितीचा याचा ताळमेळ बसतो का? याचे उत्तर अर्थमंत्र्यांनी जनतेला द्यायला हवे असे खा. तटकरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news