रत्नागिरी न. प. शाळांचा पट वाढला तीनपटीने

रत्नागिरी न. प. शाळांचा पट वाढला तीनपटीने
Published on
Updated on

रत्नागिरी : जान्हवी पाटील ; खासगी शाळा आणि इंग्लिश मीडियमकडे पालक व विद्यार्थी यांचा कल वाढत असताना यंदा रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळांची पटसंख्या तीनपटीने वाढली आहे. येथील नगर परिषद शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ पालकांवर आली आहे. नगर परिषद शाळांच्या शिक्षण व्यवस्थेत झालेला हा चांगला बदल कौतुकास्पद ठरत आहे. खासगी शाळांना विद्यार्थी मिळत नसताना नगर परिषदेच्या शाळा मात्र फुल्ल झाल्या आहेत.

रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे मराठी शिक्षण मिळत असल्याने पालक आपल्या पाल्यांना येथील शाळांमध्ये पाठवत आहेत. दामले विद्यालयासारख्या शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा वाढवला आहे. येथील विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत झळकत आहेत. शाळेचा चेहरा-मोहरा बदलण्यात आला आहे. विविध उपक्रम राबवण्यात येतात. इतर नगर परिषद शाळांनीही आपला शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांत प्रयत्न केले. त्यामुळे या शाळांच्या शिक्षणाकडे बघण्याचा पालकांचा द़ृष्टीकोन बदलू लागला आहे. शहरातील सर्व नगर परिषदेच्या शाळांची पटसंख्या फुल्ल झाली आहे.

दामले विद्यालयात तर प्रवेश बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माझ्या मुलाने मातृभाषेत शिक्षण घेऊन आपले संस्कार जपावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. मी स्वत: शिक्षक असून नगर परिषद शाळेत मुलाला प्रवेश घेतला आहे. नगर परिषद शाळांमध्ये आता खूप चांगले शिक्षण मिळते. ज्या गोष्टींचे संस्कार बालवयात व्हायला हवेत ते या मराठी माध्यमांच्या शाळेत चांगल्या रितीने होतानाचे अनुभव आपण घेतलेला आहे. सगळ्या बाबींचा विचार करूनच आम्ही आमच्या मुलाला छोट्या गटात प्रवेश घेतला आहे, अशी प्रतिक्रिया पालक मंजिरी गोरीवले यांनी दिली.

प्रवेश बंद केल्याचे सांगूनही शेकडो पालक प्रवेशासाठी विनवणी करायला येतात. मात्र, आम्ही वर्ग कमी पडत असल्याचे सांगतो. छोट्या गटात तब्बल 318 मुले झाली असून या मुलांसाठी चार ते पाच गट करावे लागले.
– प्रकाश जाधव
मुख्याध्यापक, दामले विद्यालय

नगर परिषद शाळांमध्येही
दर्जेदार शिक्षण मिळते. मी स्वत: शिक्षक म्हणून नोकरी करते. माझ्या मुलाने मराठीत शिकावे, मराठीत नीट बोलावे, या हेतूने हा प्रवेश घेतला आहे. इंग्रजीची आवश्यकता आहे. आता तर नगर परिषद शाळांमध्येही पहिलीपासूनच इंग्रजी शिकवले जाते. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
– पूनम काटकर
पालक-कुवारबाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news