कुडाळ पंचायत समितीचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव!

कुडाळ पंचायत समिती
कुडाळ पंचायत समिती
Published on
Updated on

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहीमेमध्ये सर्वोकृष्ट निवड झाल्याबद्दल कुडाळ पंचायत समितीला राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्यामध्ये 23291 शोषखड्यांमध्ये एकट्या कुडाळ तालुक्यात 9 हजार 317 असे सर्वाधिक शोषखड्डे मारण्यात आले आहेत. सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजनेचा शुभारंभ शुक्रवारी ३ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुडाळ पंचायत समितीला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.

यावेळी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, प्रधान सचिव नंदकुमार, आयुक्त शंतुनू गोयल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कुडाळ पंचायत समितीला मिळालेला हा पुरस्कार पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी स्वीकारला. यावेळी पंचायत समितीचे शेखर माळकर, राजू खेत्री, मंगेश जाधव, दिक्षा माळकर, विनोद राणे, विलास गोसावी, अमित देसाई, रुपेश चव्हाण, दिनेश सर्वेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

कुडाळ तालुक्यात 9317 शोषखड्डे मारून पूर्ण केले आणि या प्रत्येक शोषखडयामध्ये एका कुटुंबामागे 2557 रू.अनुदान मिळाले. राज्यामध्ये 23291 त्यापैकी 9317 कुडाळ तालुक्याने शोषखड्डे मारले होते. या वैशिष्ट्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाची राज्य शासनाने दखल घेवुन या कार्याबद्दल कुडाळ पंचायत समितीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर केला होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news