National Weather updates
उत्तराखंडात अतिवृष्टी! राज्यातील 'या' भागात अतिमुळधारेचा इशाराFile Photo

Weather updates | उत्तराखंडात अतिवृष्टी! राज्यातील 'या' भागात अतिमुळधारेचा इशारा

८ जुलै रोजी' या' किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तराखंडसह राज्यातील पश्चिम किनारपट्टी भागातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी सुरू असून, राज्यातील कोकण आणि गोवा किनारपट्टीला आज (दि.७ जुलै) आणि सोमवारी (दि.८ जुलै) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

८ जुलै रोजी कोकण, गोवा किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा

राज्यातील कोकण आणि गोव्यात आज ७ जुलै रोजी मुसळधार (64.5-115.5 मि.मी.) ते अति मुसळधार (115.5-204.4 मि.मी.) ते अतिवृष्टी सदृश्य (204.4 मि.मी. पेक्षा कमी) पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर सोमवारी देखील कोकण आणि गोवा किनारपट्टीवर मुसधार (64.5-115.5 मिमी) ते अतिवृष्टीसदृश्य (115.5-204.4 मिमी) पावसाची अधिक शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट, चारधाम यात्रा स्थगित

रविवार ७ जुलै रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार (64.5-115.5 मिमी), अतिमुसळधार ते (115.5-204.4 मिमी) ते अतिवृष्टी पाऊस (>204.4 मिमी) होण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर  चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

आज आणि उद्या उत्तराखंडच्या गढवाल भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चारधाम यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news