राज्यातील 'या' भागांत पावसाचा जोर वाढणारFile Photo
कोकण
Weather Forecast|राज्यातील 'या' भागांत पावसाचा जोर वाढणार
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात ऑरेंज अलर्ट
पुढारी ऑनलाईन डेस्क: पुढील काही दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आज (दि.३० जून) भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार तर मराठवाड्यात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने कोकण-गोव्यासाठी शनिवार २९ जून ते बुधवार ३ जुलै आणि मध्य महाराष्ट्रासाठी शनिवार २९ जून ते मंगळवार २ जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे आणि रायगडमध्ये देखील बुधवार ३ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सिंधुदुर्ग आणि सांगली सोमवार १ जुलै ते बुधवार ३ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

