

विजयदुर्ग ः‘एक पणती मावळ्यांसाठी, एक दिवा सैनिकांसाठी’ या विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित उपक्रमांतर्गत किल्ले विजयदुर्ग येथे 1 जानेवारी 2026 रोजी 5000 पणत्या प्रज्वलित करण्यात येणार आहेत. विजयदुर्ग किल्ल्यावर होणाऱ्या या भव्य दिव्य दीपोत्सवास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच अतुल रावराणे उपस्थित राहणार आहेत.
1 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 3.30 वा. विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह सर्व शिवप्रेमी मंडळाचे आगमन विजयदुर्ग बंदर जेटी येथे होईल. दुपारी 3.30 ते 4 वा. मान्यवर पाहुणे आणि मंडळांचे स्वागत. दुपारी 4 वा.छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात तसेच माध्यमिक विद्यालय विजयदुर्ग शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या तालासुरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. संध्याकाळी 5.30 ते 6 वा. पर्यंत महिलांकडून महाराजांची पालखी हनुमान मंदिर समोरील स्टेजवर विराजमान होणार आहे. संध्याकाळी 6 ते 6.15 वा. छत्रपती शिवरायांची आरती होणार आहे.
संध्याकाळी 6.15 ते 6.20 वा. ‘एक पणती मावळ्यांसाठी, एक दिवा सैनिकांसाठी’ श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 6.25 वा. हनुमान मंदिर जवळ मशाली प्रज्वलन करून महाराजांची पालखी मिरवणूक आरंभ होणार आहे. संध्याकाळी 7 वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे भवानी माता मंदिर येथे आगमन व भवानी मातेची आरती होणार आहे. संध्या. 7.20 वा. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी दरबार हॉलमध्ये आगमन व महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा प्राथमिक शाळा रामेश्वर यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सादरकर्ते शितल देवलकर सर. रात्री 7.50 वा. पालखी मुख्य कार्यक्रमासाठी रंगमंचावर वाटचाल करणार आहे. रात्री 8.15 वा. पालखी मुख्य रंग मंचावर विराजमान होणार, 8.30 वाजता उपस्थित मान्यवरांचे आणि सहभागी शिवप्रेमी मंडळांचे सन्मानचिन्ह देऊन आभार मानले जाणार आहेत. रात्री 9 वा.म्युझिक लवर्स नवी मुंबई प्रस्तुत माझ्या राजा रं! शिवकालीन महाराजांवर आधारित आणि देशभक्तीपर गाण्यांची संगीतमय मैफिल होणार आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमांमध्ये प्रमुख आकर्षण शिवकालीन आरमारी जहाज सेल्फी पॉईंट व रो रो बोट प्रतिकृती हे असणार आहे. सर्व शिवप्रेमी व ग्रामस्थ यांनी या दीपोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाने केले आहे.