

कुडाळ : वेताळ बांबर्डे - कदमवाडी रस्त्यावर खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे 1 ऑगस्टपासून या मार्गात्तरील एसटी वाहतूक बंद करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला होता. मात्र वेताळ बांबर्डे कदमवाडी आणि नळ्याचा पाचा येथील ग्रामस्थांनी रवि
वेताळ बांबर्डे -भोगलेवाडी ते कदमवाडी शाळेपर्यंतच्या रस्त्याची खड्डे पडून पार चाळण झाली आहे. कदमवाडी या भागात मोठी लोकवस्ती आहे. त्यामुळे या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते. या भागातून वाहने हाकताना वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्याचदा या खड्ड्यांमधून वाहने हाकताना खड्ड्यातील पाणी पादचार्यांच्या अंगावर उडते. त्यामुळे पादचार्यांमधून संताप व्यक्त केला जात होता.
धोकादायक वळणावर झाडी वाढल्यामुळे देखील अपघाताची शक्यता होती. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे 1 ऑगस्टपासून एसटी बसची वाहतूक देखील या मार्गाने बंद होणार होती. याचा वयोवृद्ध व्यक्ती, स्थानिक भाजीविक्रेते यांच्यासह विद्यार्थ्यांना बसणार होता. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून देखील प्रशासनाकडून कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. अखेर संतप्त ग्रामस्थांनी रविवारी स्वतः पुढाकार घेत श्रमदानातून खड्डे बुजवले. तसेच धोकादायक वळणावरील झाडी देखील ग्रास कटरच्या सहाय्याने साफ केली.