

वेंगुर्ला : वेंगुर्ला पोलिसांनी सोमवारी मटका व्यवसायावर धडक कारवाई केली. सोमवारी दुपारी 2.30 वा. शहरातील माणिकचौक कडे जाणार्या रोडच्या, बाजूस असलेल्या बंद घराच्या पाठीमागील बाजूस कल्याण मटका जुगार खेळ चालवणार्या श्रीकृष्ण दत्ताराम पालव (50, रा. भराडी मंदिराजवळ वेंगुर्ला) यांच्याकडील 1950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार भगवान चव्हाण हे करीत आहेत. तर एलसीबीने केलेल्या कारवाईत दुपारी 3 वा. च्या सुमारास शिरोडा एसटी स्टॅन्ड समोर प्रियांका पान स्टॉल च्या बाजूस लक्ष्मण तातोबा परब (42, रा. शिरोडा देऊळवाडी) व हरेश वराडकर (रा. आजगाव सावंतवाडी) हे कल्याण मटका जुगार खेळवत असताना आढळून आले.
त्यांच्याकडील मटका साहित्यासह 5150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. याचवेळी एलसीबीच्या पथकाने शिरोडा एसटी स्टॅन्डसमोर योगेश गुरुनाथ आचरेकर (35, रा. शिरोडा) हे कल्याण मटका जुगार खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडील मटका साहित्यासह 6,095 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.