Sindhudurg Tourism Updates | भरतगड किल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी सहकार्य

मंत्री आशिष शेलार : किल्ल्यातील विकासकामांचा घेतला आढावा; आतापर्यंत 12 कोटी निधी खर्च झाल्याची माहिती
Sindhudurg tourism updates
मसुरे : भरतगड किल्ल्याची पाहणी करताना ना. आशिष शेलार. सोबत इतर. Pudhari Photo
Published on
Updated on

मसुरे : मसुरे येथील भरतगड हा एक प्राचीन किल्ला आहे. शासनाचा आतापर्यंत बारा करोड रुपयांचा निधी या किल्ल्यासाठी खर्च झालेला आहे. येथील तटबंदी मजबूत करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. यापुढील कामांचे नियोजन करण्याच्या द़ृष्टीने आपण या किल्ल्याची आज पाहणी केलेली आहे. सदर कामांचे अंदाजपत्रक लवकरच बनविण्यात येईल. ही कामे सुद्धा वेळेत पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे.

या किल्ल्याला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठी येथील रस्ता जिल्हा नियोजन किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पक्का स्वरूपाचा होण्याबाबत निर्देश देण्यात येतील. तसेच किल्ल्याबाबतची माहिती असलेला फलक येथे कायमस्वरूपी लावण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी येथे दिली.

मसुरे येथील भरतगड किल्ल्याला मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली. मंत्री शेलार यांनी किल्याचा मुख्य बुरुज, आतील टेहळणी बुरुज, खंदक, प्राचीन विहीर याबाबत माहिती घेतली. तसेच किल्यातील सिद्ध महापुरुष मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना या किल्ल्याबाबत माहिती दर्शवणारा फलक कायमस्वरूपी लावावा, अशा सूचना केल्या.

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सचिव अतुल काळसेकर, पुरातत्व विभाग सहायक संचालक विलास वहाणे, ओएसडी शरद डोके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सिंधुदुर्ग बँक संचालक बाबा परब, संदीप हडकर, संग्राम प्रभूगावकर, बंडू गावडे, रोहेश गावकर, जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, यासिन सय्यद, पराग खोत आदी उपस्थित होते.

Sindhudurg tourism updates
Sindhudurg fort : सिंधुदुर्ग किल्ला जेटी ढासळतेय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news