

सगुण मातोंडकर
मळगाव : सिंधुदुर्गातील पर्यटनद़ृष्ट्या समृद्ध असलेल्या शिरोडा - वेळागर समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पर्यटन हंगामात दररोज हजारो पर्यटक या किनार्यावर भेट देतात. प्रतिकूल वातावरणात अंतर्गत समुद्री प्रवाहाचा वेग समुद्राच्या संपर्कात जाणार्या पर्यटकांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. पर्यटकांना वेळागर किनार्यावर सुरक्षाच मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे वेळागर समुद्रकिनारा सुरक्षेअभावी धोक्याचा बनला असल्याने त्याचा पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. समुद्राचे आकर्षण असणार्या पर्यटकांसाठीच्या उपाययोजनांचा अभाव आणि त्यातून ओढवणार्या मृत्युचक्र याची शासनाने गंभीर दखल घेण्याची गरज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनद़ृष्ट्या समृद्ध असलेला वेळागर समुद्रकिनारा पर्यटनास प्रसिद्ध आहे. वेळागर किनार्यावर असलेली सुरुच्या उंच झाडांची बाग पर्यटकांना भुरळ घालते. शिरोडा वेळागर समुद्रकिनारा गोवा राज्याला लागूनच असल्यामुळे गोव्यात आलेले विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने वेळागर किनार्याला भेट देतात. पर्यटकांचा ओघ असलेला वेळागर समुद्रकिनारा पर्यटकांना महत्त्वाचा वाटतो. पर्यटन हंगामात दररोज हजारो पर्यटक या किनार्यावर येऊन आनंद लुटतात.
पावसाळी हंगाम प्रतिकूल हवामानामुळे अजून संपलेला नाही. तरीही दररोज सुमारे पाचशे पर्यटक या ठिकाणी भेट देतात. गेले दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे या किनार्यावर आलेल्या पर्यटकांना फेसाळणार्या समुद्री लाटांची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. तशीच भुरळ शुक्रवारी पर्यटकांना पडल्यामुळे पर्यटक समुद्राच्या संपर्कात गेले आणि अतिशय दुःखद अशी जीवघेणी घटना घडली.
हवामान विभागाने गुरुवारी मध्यरात्रीनंतर पश्चिम बंगालच्या उपसागरात तासी 75 किलोमीटर वेगाने वारे वाहून पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यादरम्यान अरबी समुद्रातील अंतर्गत प्रवाह अतिशय गतिमान झाले होते. समुद्रावर येऊन आदळणार्या उंच उंच लाटांमध्ये समुद्रात खेचून घेण्याचा वाढता करंट होता. अशा परिस्थितीत वेळागर समुद्रकिनार्यावर समुद्राच्या संपर्कात गेलेल्या पर्यटकांना आपला जीव समुद्र लाटांच्या करंटचा अंदाज न आल्यामुळे गमवावा लागला. सगळ्यांना स्तब्ध करून टाकणार्या अतिशय दुर्दैवी अशा या घटनेमुळे पर्यटनद़ृष्ट्या समृद्ध असलेल्या किनारपट्टीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
पर्यटन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनार्यावर येणार्या प्रत्येक पर्यटकाला आपली सुरक्षा महत्त्वाची वाटत आहे. समुद्रकिनारे सुरक्षित असले तरच आपण सुरक्षित असल्याची खात्री पर्यटकांना होते. समुद्रकिनार्यावर येणार्या पर्यटकांसाठी समुद्रकिनारा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. पर्यटनासाठी येणार्या देशी विदेशी पर्यटकांना वेळागर समुद्रकिनारा सुरक्षित वाटत नाही, याचीही जाणिव प्रशासनाने ठेवणे गरजेचे आहे.
शिरोडा येथे ऐतिहासिक मिठागर, रेडी द्विभुज गणपती या प्रसिद्ध स्थळांना भेट देणारे पर्यटक शिरोडा, वेळागर समुद्रकिनार्यावर अगत्याने पर्यटनासाठी येतात. येणार्या पर्यटकांना सुविधा मिळत नाहीत. समुद्री सुरक्षा उपाययोजना (डशर डरषशीूं चशर्रीीीशी) तोकड्या असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. शिरोडा वेळागर समुद्र किनार्यावर सध्याची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्थिती ही रामभरोसे आहे.
शिरोडा वेळागर किनार्यावर पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत प्रशिक्षित जीवरक्षकांचा (ङळषश र्ॠीरीवी) अभाव आहे. वेळागर समुद्रामधील पाण्याचे प्रवाह (ठळि र्उीीीशपीीं) किंवा अचानक वाढणारी पाण्याची खोली असलेल्या धोकादायक ठिकाणांबद्दल स्पष्ट आणि ठळक सूचना देणारे फलक (थरीपळपस डळसपी) पुरेसे नाहीत. ज्या ठिकाणी समुद्रात अपघात घडला आहे त्या ठिकाणी सूचनाफलकच नाही. केवळ दोन सूचनाफलक आहेत. त्यातील एक तुटलेल्या अवस्थेत आहेत. वेळागर समुद्रकिनार्यावर समुद्र गेलेल्या पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वापरता येणारी रेस्क्यू ट्यूब्ज, जेट स्कीज किंवा प्रथमोपचार साहित्य उपलब्ध नाहीत.
वेळागर किनार्यावर बरेच देशी विदेशी पर्यटक येतात. त्या पर्यटकांना येथील स्थानिक समुद्रातील वातावरणाची माहिती नसते. त्यामुळे असे पर्यटक स्थानिक वातावरणातील परिस्थितीत समुद्राच्या लाटा आणि पाण्याचा अंदाज न घेता खोल पाण्यात उतरतात, ज्यामुळे दुर्दैवी दुर्घटना घडतात. स्थानिक समुद्राच्या प्रवाहाबद्दलची अनभिज्ञता हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे.
प्रशासनाने जीवरक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करून त्यांना तातडीने पुरेसे प्रशिक्षित आणि पूर्णवेळ जीवरक्षक नियुक्त करून त्यांना आवश्यक उपकरणे पुरवावीत. वेळागर किनार्यावर किनारा सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घडणार्या घटनांवर लक्ष ठेवणे. समुद्रकिनार्यावर पोलीस गस्त वाढवून अनुचित प्रकार रोखावेत. किनार्यावर येणार्या पर्यटकांमध्ये जागरूकता मोहीम सुरू करून पर्यटकांना समुद्राच्या धोक्यांविषयी माहिती देण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत वारंवार घोषणा देण्यासाठी यंत्रणा उभी करावी. तसेच माहितीपत्रके प्रकाशित करावीत. समुद्राच्या प्रमाणवेळेनुसार भरती-ओहोटीच्या वेळांची माहिती पर्यटकांना द्यावी. अपघात ग्रस्त समुद्रकिनार्यावर ठळक अक्षरात मोठ्या फलकांवर रोजची भरती-ओहोटीची वेळ स्पष्टपणे नमूद करावी. वेळागर समुद्रकिनार्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने उपाययोजनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.