

वैभववाडी : वैभववाडी रेल्वे स्टेशनवरील दोन प्लॅटफॉर्मला जोडणार्या उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच हे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. आगामी गणेशोत्सवापूर्वी उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून प्रवाशांना खुले करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
वैभववाडी रेल्वे स्टेशन हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेले महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र कोकण रेल्वे प्रशासन स्टेशनवर सुविधा पुरविण्यात आखडता हात घेत आहे. यापैकी प्रवशाकडून करण्यात येणारी दोन प्लॅटफॉर्म जोडणारा उड्डाणपूल करण्याची मागणी पूर्णत्वाकडे जात आहे. गेल्यावर्षी पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वे स्टेशन येथे रेल्वेच्या अधिकार्यांसमवेत रेल्वे स्टेशन वरील विविध समस्या सोडवण्यासाठी बैठक आयोजित होती. यावेळी दोन प्लॅटफॉर्मला जोडणारा पूल टाकळीने मंजूर करून उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पालकमंत्री राणे यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करून बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे.
गणेश उत्सव काळात प्रवासी मोठ्या संख्येने रेल्वे गाड्याने प्रवास करतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हे उड्डाणपूल पूर्ण करून प्रवाशांना मोकळी करावेत, अशी मागणी प्रवाशांतून करण्यात येत आहे.
दोन प्लॅटफॉर्मला जोडणारा उडाणपूल नसल्यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्म नंबर वर दोन वर जाताना प्लॅटफॉर्मवरून उतरून ट्रॅक ओलांडत ओलांडत दुसर्या प्लॅटफॉर्मवर चढावे लागत होते यामध्ये ज्येष्ठ नागरिक अपंग लहान मुले महिला यांना त्रास सहन करावा लागत होता. याकडे प्रसार माध्यमातून सातत्याने आवाज उठवण्यात येत होता. हा पूल पूर्ण झाल्यावर प्रवाशांना होणार्या त्रासातून सुटका होणार आहे.