

जप्त केलेले बैल खांबाळे येथील गोशाळेमध्ये देखभालीसाठी ठेवण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.
वैभववाडी : गुरांची अवैध वाहतूक करणार्या राधानगरी येथील युवकाला वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर अशोक थोरवत (42, रा. कासारवाडा ता. राधानगरी) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. वैभववाडी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ही कारवाई सोमवारी रात्री 9.30 वा. भुईबावडा घाटात केली आहे.
भुईबावडा घाटमार्गातून गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. वैभववाडी पोलिसांनी भुईबावडा घाटात नाकाबंदी केली. तपासणी करीत असताना एक टेम्पो तेथे आला. या टेम्पोत दोन खिल्लारी जातीचे बैल असल्याचे पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी तो टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोत 20 हजार रुपये किंमतीचे दोन बैल होते. सागर अशोक थोरवत हा युवक कोल्हापूरकडे घेऊन निघाला होता. थोरवत यांच्यावर गुरांची अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक राजन पाटील, हरीश जायभाय, रणजीत दबडे, रघुनाथ जांभळे यांनी केली आहे.