

वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवर एडगाव ते करूळ दरम्यान रस्त्याचे काम चालू असून अर्धवट कामामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. या दरम्यान हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे. याठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
तळेरे- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले वर्षभर सुरू आहे. मात्र एडगाव ते करूळ दरम्यान दोन ठिकाणी काम अर्धवट असल्यामुळे या ठिकाणी चिखल झाला आहे. या चिखलातून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तर मोटार सायकल व रिक्षा वाल्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
याठिकाणी अनेक वेळा मोटार सायकल स्वार घसरून पडून अपघात झाले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे याठिकाणी मृत्यूचा सापळा झाला आहे. याठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.