सिंधुदुर्ग : वायंगणतड येथील अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

टेम्पोने दिली दुचाकीला धडक
Sindhudurg Road Accident
अपघातात झालेले दोन्हा वाहनांची अवस्थाPudhari Photo
Published on
Updated on

दोडामार्ग पुढारी वृत्तसेवा

वायंगणतड येथील एका अवघड वळणावर दुचाकी व भाजी वाहतुक करणाऱ्या टेम्पोत समोरासमोर धडक बसून मंगळवारी (दि.17) भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. संतोष मधुकर शेटकर (५२, रा. घोटगेवाडी) व अनामारी मिंगीस सोज (५०, रा. तिलारी) अशी दोघांची नावे आहेत. तर टेम्पोतील लहान मुलासह त्याची आई जखमी झाले आहेत. टेम्पोचालक आदम हुसेन नाईकवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sindhudurg Road Accident
Accident Case | एकाच 'स्पॉट' वर तीन अपघात

साटेली-भेडशी येथील भाजी विक्रेता आदम नाईकवाडी हा पिकअप टेम्पो घेऊन मंगळवारी (दि.17) सकाळी भाजी आणण्यासाठी बेळगावच्या दिशेने जात होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी व लहान मुलगा होता. त्यांची गाडी दोडामार्ग-विजघर राज्य मार्गावरील वायंगणतड येथील अवघड वळणावर आली असता आदमचे गाडीवरील नियंत्रण सुटले. दरम्यान घोटगेवाडी येथील संतोष शेटकर हे त्यांच्या दुचाकीने साटेली-भेडशीच्या दिशेने येत होते. त्यांच्या दुचाकीवर अनामारी सोज हि महिला मागे बसली होती. नियंत्रण सुटलेला टेम्पो विरुद्ध दिशेला गेल्याने दुचाकी व त्याची समोरासमोर जोरदार धडक बसली.

या धडकेत दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागला. दोघांच्याही डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले. त्यांची स्थिती ही चिंताजनक होती. अपघातानंतर जोरदार आवाज झाल्याने स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून स्थानिक अपघातग्रस्तांना दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र संतोष शेटकर यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर अनामारी सोज यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी त्यांना गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अपघातात चालकाची पत्नी व लहान मुलगा किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Sindhudurg Road Accident
यवतमाळ : साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून अपघात; ग्रामसेविकेचा मृत्यू

टेम्पोचालकास पोलिसांनी घेतले ताब्यात

टेम्पोचालक आदम नाईकवाडी याच्याविरुद्ध मयत शेटकर यांचे चुलत बंधू श्रीनिवास मुकुंद शेटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेतले असून बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news