Two arrested in case of suicide
आत्महत्येप्रकरणी दोघांना अटकPudhari File Photo

सिंधुदुर्ग : आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक

दोन दिवस पोलिस कोठडी; अन्य दहाजण फरार
Published on

सावंतवाडी ः

कोलगाव भोम येथील अक्षय साईल याच्या आत्महत्ये प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी शुक्रवारी दोन जणांना ताब्यात घेतले. प्रशांत भालचंद्र पडते (56) व प्रथमेश प्रशांत पडते (28 दोघेही रा. कोलगाव भोम) यांना अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यातील उर्वरित दहा संशयितांचा पोलिस कसून शोध घेत आहेत; मात्र ते फरार असल्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

Two arrested in case of suicide
चिंताजनक आत्महत्या

कोलगाव येथील अक्षय साईल याने गाडी मालक व काही युवकांनी गाडीच्या पैश्यांवरून सातत्याने तगादा लावल्याच्या कारणावरून माडखोल येथील धरणात आत्महत्या केली होती. ज्या युवकांनी गाडी फिरण्यासाठी नेली होती त्यांनी त्या गाडीचा अपघात केला होता. त्यामुळे गाडी मालकाचे मोठे नुकसान झाले होते. मयत अक्षय याने संशयित व ओळखीचे असलेले प्रशांत पडते यांच्या सांगण्यावरून आपल्या ओळखीने ती गाडी पर्यटनासाठी ठरवून दिली होती. मात्र, अपघात झाल्यानंतर गाडी मालकाने अक्षय यालाच जबाबदार धरत त्याच्याकडे भरपाईपोटी साडे सात लाख रुपयांची मागणी केली. सतत पैशांवरून अक्षय याला ब्लॅकमेल केले जात होते. धमकी दिली जात होती. शिवाय त्याच्या घरीही जाऊन त्याला सतावण्याचे प्रकार सुरुच होते. याला कंटाळून अक्षय याने गाडी मालकाला साडे पाच लाख रुपये स्वतःकडील नेऊन दिले व वरील पैसे आपल्याकडे नसल्याचे सांगत आपण अपघात केला नसून ज्यांनी केला त्यांच्याकडून घेण्यात यावेत, असे सांगितले.

Two arrested in case of suicide
नाशिक : उसनवारीचे पैसे फेडता न आल्याने शेतक-याची आत्महत्या

त्याचा राग मनात धरून संशयित दहा ते बारा जणांनी आत्महत्येपूर्वी अक्षयला दोन दिवस अगोदर बेदम मारहाण केली होती. त्यानंतर तो घराबाहेर पडला नाही. त्याच्या चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली होती. या मारहाणीमुळे नैराश्य आल्याने अक्षय याने चिठ्ठी लिहून ठेवत त्यात नऊ जणांचा उल्लेख केला. या लोकांमुळे आपणास नाहक त्रास होत असून, त्यांच्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस हेच लोक जबाबदार आहेत. त्यांना देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. आपण या सर्वांना त्यांच्या पापाची शिक्षा द्यावी, असा उल्लेख करुन तो घरातून निघून गेला होता.

तो थेट माडखोल धरणात जाऊन त्याने दुचाकी लाऊन चप्पल काढून मोबाईल फेकत उडीच घेतली. जी चिठ्ठी त्याने लिहिली होती ती त्याने सर्व संशयितांना पाठवली होती व आपल्या मोबाईलवर स्टेटसदेखील ठेवला होता. त्यामुळे अक्षय आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे स्पष्ट झाले व त्याची सगळीकडे शोधाशोध सुरु झाली. त्याचा मृतदेह गुरुवारी माडखोल धरणात सापडला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तातडीने प्रशांत भालचंद्र पडते व प्रथमेश प्रशांत पडते या दोघांना तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी अन्य संशयितांच्या घरी शोध घेतला; मात्र ते आढळून आले नाहीत. उर्वरित सर्व संशयित फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील करत आहेत.

Two arrested in case of suicide
सिंधुदुर्ग : वागदे येथील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

12 संशयितांवर आहे गुन्हा दाखल

अक्षयचे वडील जनार्दन साईल यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चिठ्ठीमध्ये नमूद असलेल्या परवेज शेख, अजित बाळकृष्ण मठकर, सलीम सय्यद, तेजस पोतदार, परवेजचे बाबा, संकेत माळी, श्यामू नामक, प्रशांत भालचंद्र पडते, प्रशांत पवार, प्रथमेश प्रशांत पडते, एक महिला व अन्य एक जण असे मिळून एकूण बारा संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी संशयितांना तातडीने अटक करा, अशी मागणी कोलगाव ग्रामस्थांनी लावून धरली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news