राजकोट येथील पुतळा कोसळल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

न्यायालयाने सुनावली 19 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
The police arrested the third accused in the case of statue collapse in Rajkot
राजकोट पुतळाप्रकरणी तिसऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटकFiIle Photo
Published on
Updated on

मालवण : राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर या गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीला अखेर आज सायंकाळी उशिरा मालवण पोलिसांनी अटक केली आहे. परमेश्वर यादव (रा. उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव असून त्याला येथील न्यायालयासमोर हजर केले असता 19 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. परमेश्वर यादव याने पुतळ्याचे बांधकाम केले होते.

The police arrested the third accused in the case of statue collapse in Rajkot
मालवण समुद्रकिनाऱ्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला

राजकोट किल्ल्यावर डिसेंबर महिन्यात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट कोसळला होता. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणात चेतन पाटील आणी जयदीप आपटे याला अटक करण्यात आली असून हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आज तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news