विदेशी महिला जंगलात झाडाला बांधलेल्‍या अवस्‍थेत सापडली

सावंतवाडी पोलिसांकडून तपास सुरू
The foreign woman was found tied to a tree in the forest
विदेशी महिला जंगलात झाडाला बांधलेल्‍या अवस्‍थेत सापडली Pudhari Photo
Published on
Updated on

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सोनुर्ली – रोणापाल हद्दीवरील जंगल परिसरात एक विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली असल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला आज (शनिवार) सकाळी एका गुराख्याच्या निदर्शनास आली. त्यानंतर याबाबत पोलीसांना माहिती देताच सावंतवाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

The foreign woman was found tied to a tree in the forest
Maharashtra Rain Updates Live : राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून एका झाडाच्या बुंध्याला कुलुपबंद करण्यात आले होते. रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीचे डोंगर या घनदाट जंगलात ही महिला आढळून आली आहे. सलग तीन दिवस ती याच अवस्थेत होती. उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती.

The foreign woman was found tied to a tree in the forest
Rain Update Sakri | साक्री तालुक्यात पश्चिम पट्ट्यासह दमदार पाऊस ; मालनगाव धरण 'ओव्हरफ्लो'

जंगलात सोनुर्लीतील काहीजण गुरे चारण्यासाठी गेले असता या महिलेचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. दरम्यान, तिच्या पतीकडून हा प्रकार घडला असावा असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत या महिलेवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ती काही बोलू शकत नसल्यामुळे अधिक तपास करण्यात अडचण येत असल्याचे पोलीसांनी सांगितले.

दरम्यान, तिच्याकडे सापडलेल्या कागदपत्रावरून संबंधित महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस असून ती तामिळनाडूमधील रहिवासी आहे. ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचे देखील समजते. या प्रकरणी अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे करत आहेत.

मानसिक धक्का बसल्याने मानसोपचार तज्ञांकडे उपचारासाठी पाठवणार

याबाबत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर महिलेला मानसिक धक्का बसला असून तिला जंगलामध्ये बांधून ठेवण्याचा प्रकार तिच्या नवऱ्याकडून केला असावा असा तिच्या बोलण्यावरून वाटत आहे, मात्र तिला जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने तिच्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचार केल्यानंतर हा नेमका प्रकार काय आहे याबाबतचा उलगडा होणार असल्याचे सांगितले. तिच्यासोबत कोणीही कुटुंबीय नसल्यामुळे पोलीसच याबाबतचा निर्णय घेणार आहेत तसा आपण सल्ला दिल्याचे डॉ.ऐवळे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news