Singdhudurg News|तोंडवळी तळाशील किनारपट्टीसाठी 13 कोटीचा बंधारा मंजूर!

तळाशीलची किनारपट्टी बंधारा बांधून भक्कम करणार : आमदार निलेश राणेंकडून पहाणी.
Singdhudurg News
तळाशील : अरबी समुद्राचा उधाणाचा फटका बसून समुद्राने गिळंकृत केलेल्या तळाशिल किनारपट्टीची आमदार निलेश राणे यांनी पाहणी केलीPudhari Photo
Published on
Updated on

छाया : उदय बापर्डेकर

आचरा: गेले काही आठवडे मुसळधार पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्राला पौर्णिमेच्या दिवशी आलेल्या उधाणाचा  फटका तोंडवळी तळाशील किनारपट्टीला बसला होता. बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील भागाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला होता. समुद्र वस्तीच्या दिशेने आक्रमण करत होता. तातडीने उपाययोजना म्हणून त आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने बंधारा घालण्याचे काम हाती घेतले होते.

अधिवेशनानंतर तात्काळ आमदार निलेश राणे यांनी तळाशील भागाला भेट देत किनारपट्टीची पहाणी करत ग्रामस्थांशी संवाद साधत आपली किनारपट्टी भक्कम बंधाऱ्याने सुरक्षित केली जाणार असून 800 मीटर व 500 मीटरचा दुसरा टप्पा असणाऱ्या बंधऱ्यांसाठी 13 कोटी रुपये मंजूर असून येणाऱ्या मे महिन्यापर्यंत बंधारा पूर्ण केला जाणार असल्याची ग्वाही आमदार राणे यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार राणेंचे तसेच तात्काळ दखल घेणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले.

Singdhudurg News
Sindhudurg News | तोंडवळी - तळाशिल किनारपट्टी संरक्षित करण्यासाठी बंधारा घालण्याच्या कामाला सुरूवात

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, दीपक पाटकर, दादा साहिल, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, तोंडवळी माजी सरपंच जयहरी कोचरेकर, चेतना फायबरचे संजय तारी, ग्रामपंचायत सदस्य भूपाळ मालंडकर, केशर जुवाटकर, संजय तारी, नंदकिशोर कोचरेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, मुजफ्फर मुजावर, चंदू कदम, श्रीकृष्ण रेवंडकर, सुधाकर आडकर, गणेश रेवंडकर, विद्याधर पराडकर, गजा कांदळगांवकर, प्रकाश बापर्डेकर, पांडुरंग शेलटकर, कुणाल पाटकर, गौरव मालोंडकर, पांडुरंग तारी , श्रीकृष्ण टिकम, सत्यवान केळुसकर, आनंद खडपकर, तळाशील मधील महिलावर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.

तळाशील ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालण्याचे काम ठाकरे सरकार ने केले आमदार- राणे

यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले की मागील वेळेला तळाशील बंधारा व्हावा म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन केले होते मी आमदार नसतानाही ग्रामस्थांची भेट घेतली. बंधाऱ्यांसाठी 10 कोटीचा निधी उपलब्ध करून देतो असे सांगितले होते. त्याची कार्यवाही पण चालू केली त्यावेळेस राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्राचा खासदार केंद्राचा 10 कोटीचा निधी येत होता परंतु तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने अनेक कारणे देत तो निधी इथे येऊ दिला नाही.

Singdhudurg News
Konkan Coastal Storm | तळाशील किनारपट्टीला उधाणाचा फटका

केवळ राणेंना श्रेय मिळेल म्हणून हा निधी नाकरण्याचे काम त्यांनी केले. तळाशील चा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता केवळ राणे कुटुंबाला श्रेय मिळेल म्हणून तळाशील ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालण्याचे काम त्यांनी केले आहे. आता परिस्थिती बदलली आहे आमचं सरकार आहे कोणत्याही अडचणी आल्या त्या दूर सारून विकास साधला जाणार असल्याची ग्वाही आमदार राणे यांनी ग्रामस्थांना दिली. तळाशीलचा भुभाग वाचला असेल तर तो राणेंमुळेच असे उदगार ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच जयहरी कोचरेकर यांनी काढले. गावावर प्रसंग ओढवला असताना तळशीलात दत्ता सामंत हे ठाण मांडून होते यंत्रणा राबवत तळाशील सुरक्षित करत होते असे सांगत दत्ता सामंत यांचेही ग्रामस्थांच्या वतीने कोचरेकर यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news