Vengurla Bomb Squad Action | वायंगणी समुद्रकिनारी संशयास्पद सिलिंडर

Bomb Defused Vayangani | बॉम्बशोधक, नाशक पथकाने केला निकामी
Vengurla Bomb Squad Action
सिलिंडर निकामी करताना बॉम्बशोधक पथक.(Pudhari Photo)
Published on
Updated on

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी बुधवारी सायंकाळी समुद्रातून वाहून आलेली सिलिंडरसारखी वस्तू आढळून आली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकाने गुरुवारी त्या वस्तूची पाहणी करून सुरक्षिततेच्या कारणास्तव या सिलिंडरचा स्फोट घडवून ती निकामी केली. त्यामुळे आता कोणताही धोका नसून घाबरण्याचे कारण नाही, असे या पथकाने जाहीर केले.

वायंगणी समुद्रकिनारी बुधवारी एक संशयास्पद सिलेंडर सागर सुरक्षारक्षक तथा कासव मित्र सुहास तोरस्कर यांना दिसून आला. त्यांनी तात्काळ याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी सदर घटना जिल्हा पोलीस विभागाला कळविली.

Vengurla Bomb Squad Action
वेंगुर्ले : मोचेमाड येथे सार्वजनिक स्मशानभूमीतून ४ लाख रुपयांचे साहित्य चोरीस

त्यानुसार गुरूेवारी सकाळी बॉम्ब शोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग चे पथक वायंगणी समुद्र किनारी दाखल झाले. त्यांनी सदर वस्तूची पाहणी केली. ती वस्तू बाँब नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव योग्य पद्धतीने ती निकामी करण्यात आली आहे.

Vengurla Bomb Squad Action
Sindhudurg Fishermen Subsidy News | मच्छीमार नौकाधारकांना डिझेल प्रतिपूर्ती अनुदान मंजूर

सध्याचे वातावरण योग्य नसल्याने वेळीच श्री. तोरस्कर यांनी या वस्तूची माहिती दिल्याबद्दल बॉम्बशोधक पथकाने तोरस्कर यांचे आभार मानले. पथकामध्ये अधिकारी श्री. साटम, भालचंद्र दाभोलकर, श्री. कुराडे आणि चालक जाधव यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news