

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक स्मशानभूमीत टॉवरच्या कामकाजासाठी आवश्यक असणारे एकुण 3 लाख 93 हजार 823 रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून दाखल फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत ठेकेदार धनाजी भिकु कदम, रा.वेंगुर्ला नवाबाग, (मुळ रा. कोल्हापुर) यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये 58,622 रुपये किमतीचे सोलर पॅनचे साहित्य, 96,586 रुपये किमतीचे केमिकल आर्थिंगचे रॉड 82,754 रुपये किमतीचे साईट ॲक्सेसेरीअल किट, 85,000 रुपये किमतीचे सल्पाय चेन फेन्सिंग, 70,000 रुपये किमतीचे Centring Plate (2*3 लांबी रूदीच्या एकुण 70 plates). 861 रुपये किमतीचे लाइटनिंग अरेस्टर असे एकूण 3 लाख 93 हजार 823 रुपये साहित्य चोरीस गेले आहे.
टॉवरच्या कामकाजासाठी आवश्यक असणारे हे साहित्य पेस डिजीटेक कंपनीच्या कोल्हापूर येथून आणले होते. या घटनेबाबत फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार रुपाली वेंगुर्लेकर या करीत आहेत.