ST Bus Issue Students | पाडलोस बालसभेत विद्यार्थ्यांनी मांडली एसटीची समस्या

Madura High School transport problem | मडुरा हायस्कूलमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांना गेले अनेक दिवस अनियमित एसटीचा फटका बसत आहे.
ST Bus Issue Students
पाडलोस : ओम गणेश बालसभेस गावातील उपस्थित मुले.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

मडुरा : मडुरा हायस्कूलमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांना गेले अनेक दिवस अनियमित एसटीचा फटका बसत आहे. दोन दिवसांपूर्वी नेहमीचा फलक नसल्यामुळे विद्यार्थ्यांत गोंधळ निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळा सुटण्याच्या वेळेवर एसटी यावी, अशी मागणी उपस्थित मुलांनी केली.

पाडलोस - देऊळवाडी येथे पंचायत राज संस्था आणि समुदाय आधारित संघटना अंतर्गत ओम गणेश बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओम गणेश बाल सभा अध्यक्ष सानिका गावडे, सचिव गौतमी केणी, कोषाध्यक्ष साईश नाईक, सहसचिव दिशा पाडलोस्कर, ग्रामसंघ सीआरपी नेहा नाईक, लिपिका शितल गावडे, सभासद लक्ष्मी गावडे, आशासेविका विजया गावडे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक तसेच गावातील विद्यार्थी उपस्थित होते.

ST Bus Issue Students
Sindhudurg : ‘चिमण कथा’ बालकथा संग्रहाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश

स्वागत गीताने बालसभेची सुरुवात करण्यात आली. आरोग्य विषयक माहिती, मोबाईलचे परिणाम, ‘गुड टच-बॅड टच’ या संदर्भात विजया गावडे व नेहा नाईक यांनी माहिती दिली. तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी बालसभा आयोजित करण्यात येणार असल्याचे शीतल गावडे यांनी सांगितले. बाल सभेचे सूत्रसंचालन मानवी गावडे यांनी तर सानिका गावडे यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मी गावडे यांनी आभार मानले.

ST Bus Issue Students
सिंधुदुर्ग : मडुरा येथे विहिरीत आढळला मृत बिबट्या

एसटीचा नेमका मार्ग कोणता?

नेहमी सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा असा फलक असणारी एसटी बस नेहमी येते. परंतु दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी -बांदा निगुडे सातोसे असा बोर्ड असलेली एसटी आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. मुख्य म्हणजे ही एसटी त्या मार्गे न जाता पाडलोस मार्गे पुढे रवाना झाली होती, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news