

Mumbai Goa Highway Car Accident
बांदा : मुंबई- गोवा महामार्गावर बांदा बसस्थानक नजीक असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली कार ओढ्यात कोसळली. हा अपघात बुधवारी (दि.२) रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला. बांदा पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कार मधील युवकांना बाहेर काढले.
गुरुवारी (दि.३) सकाळी ही घटना येथील नजीकच असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती बांदा पोलीस व स्थानिक ग्रामस्थांना दिली. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने व मुसळधार पाऊस सुरु असल्याने अपघात झाल्याचे लक्षात आले नाही. सदर कार सावंतवाडी येथील असल्याचे समजते.
पुलापासून १०० मीटर मागे सदर कार डिव्हायडरवर चढली व सुसाट वेगाने स्ट्रीट लाईटचा खांब तोडून सुमारे ६० फूट खोल ओढ्यात कोसळली. कार मध्ये सावंतवाडी येथील चार युवक होते. या युवकांना बांदा पोलीस कर्मचारी भोगले, राजाराम कापसे, रोहित कांबळे, दाजी परब यांनी सुखरूपपणे बाहेर काढले.