Vengurla Smart Meter Protest | 'स्मार्ट मीटर' विरोधात वेंगुर्लेत ग्राहकांचा ठिय्या

Vengurla Smart Meter Protest-कर्मचाऱ्यांविरोधात मांडल्या तक्रारी
Vengurla Smart Meter Protest
वेंगुर्ले : महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोन छेडताना वीज ग्राहक संघटना पदाधिकारी व ग्रामस्थ
Published on
Updated on

वेंगुर्ले : महावितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात वेंगुर्ले तालुक्यातील विद्युत ग्राहकांनी वेंगुर्ले वीज कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. वीज ग्राहकांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राहकांनी या वेळी दिला.

स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, रिक्त वायरमन पदे तातडीने भरावीत, ग्राहकांना नियमितपणे वीज बिले उपलब्ध करून द्यावीत तसेच स्मार्ट मीटरमध्ये बिल भरण्याची मुदत संपल्यानंतर आपोआप वीजपुरवठा खंडित करणारी यंत्रणा (चिप) हटवावी, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील वीज ग्राहकांनी वीज ग्राहक संघटनेने हे ठिय्या आंदोलन केल्याचे सांगण्यात आले.

Vengurla Smart Meter Protest
Shripad Naik : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वीज परिषद लवकरच

या आंदोलनात तालुक्यातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान नागरिकांनी महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांसमोर विविध तक्रारी मांडल्या. यानंतर आंदोलनकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चच झाली. मात्र काही मागण्यांबाबत अधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

अधिकाऱ्यांनी काही मागण्यांवन सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास आणि नागरिकांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष् झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशार वीज ग्राहक संघटनेच्य पदाधिकाऱ्यांनी दिला.

Vengurla Smart Meter Protest
Shripad Naik : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वीज परिषद लवकरच

आंदोलनामुळे काही काळ महावितरण कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र, चर्चेनंतर परिस्थिती निवळली वेंगुर्ले तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, अॅड. नंदन वेंगुलेकर, जि.प. सदस्य विजय नाईक उभादांडा सरपंच नीलेश चमणकर जयराम वायंगणकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news