Sindhudurg News : आजपासून स्वतंत्र ‘सिंधुदुर्गनगरी’ महसुली गाव

जिल्हाधिकार्‍यांकडून अधिसूचना जारी; जिल्ह्यातील एकूण महसुली गावांची संख्या 759
Sindhudurg News
आजपासून स्वतंत्र ‘सिंधुदुर्गनगरी’ महसुली गाव
Published on
Updated on

ओरोस ः मौजे ओरोस बुद्रुक ( 134- 12- 80 हे.आर.), मौजे अणाव ( 95- 47- 70 हे.आर) आणि मौजे रानबांबुळी ( 10 104- 59- 70 हे.आर) असे एकूण 334- 20- 20 हे.आर. क्षेत्र संपादित करून ‘सिंधुदुर्गनगरी विकास प्राधिकरण’ ची निर्मिती 2 एप्रिल 1998 रोजी झाली आहे. उपरोक्त क्षेत्रापैकी सर्व क्षेत्राचा ताबा ‘सिंधुदुर्गनगरी विकास प्राधिकरण’ यांचेकडे आहे. त्याच क्षेत्राचा समावेश असणारे ‘सिंधुदुर्गनगरी’ हे नवीन महसुली गाव निर्माण करत असलेबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जारी केली आहे. यामुळे ‘सिंधुदुर्गनगरी’ हे नवीन महसुली गाव 1 जानेवारी 2026 पासून अस्तित्वात आले आहे. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण महसुली गावांची संख्या 759 इतकी झाली आहे. याबाबतची अंतीम अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे.

Sindhudurg News
Sindhudurg News : दै. ‌‘पुढारी‌’चा उद्या 87 वा वर्धापन दिन

नवीन महसुली गाव निर्माण करताना प्राधिकरणाच्या प्रत्यक्ष ताब्यात असणार्‍या क्षेत्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही नवीन क्षेत्राचा समावेश सदरच्या महसुली गावाच्या क्षेत्रात करण्यात आलेला नाही. तसेच मौजे रानबांबुळी येथील 77- 31 हे.आर क्षेत्र जे संपादनाकरिता प्रस्तावित होते, परंतु त्याचे भूसंपादन करण्यात आलेले नव्हते ते क्षेत्र देखील मौजे रानबांबुळी याच गावात राहणार असून संदर्भिय क्षेत्र सद्यस्थितीत ‘सिंधुदुर्गनगरी’ या नवनिर्मित महसुली गावात समाविष्ट करणेत आलेले नाही.

‘सिंधुदुर्गनगरी’ महसुली गाव निर्मिती आणि प्रस्तावित त्याच क्षेत्रातील सिंधुदुर्गनगरी नगरपरिषद निर्मिती या दोन्ही स्वतंत्र प्रक्रिया आहेत. ‘सिंधुदुर्गनगरी’ महसुली गाव निर्माण झाल्यामुळे मूळ इतर तीन गावे 1 मौजे ओरोस बुद्रुक, 2.मौजे अणाव 3. मौजे रानबांबुळी तसेच त्यालगत असणारी इतर गावे यांच्या क्षेत्रात कोणताही बदल होणार नाही. मौजे ओरोस बुद्रुक, मौजे अणाव आणि मौजे रानबांबुळी या गावातील एकूण 3 ( 38ब, 26 7ब, 1ब ) या सर्वे नंबरचा समावेश करुन ‘सिंधुदुर्गनगरी’ हे नवीन महसूली गाव निर्माण होत असल्याने प्राधिकरण क्षेत्रात वास्तव्यास असणार्‍या लोकांना महसूल तसेच ग्रामविकास विभागाकडून वितरित केल्या जाणार्‍या दाखल्यांच्या वितरण प्रक्रियेत सहजता येणार असून, त्याचा फायदा प्राधिकरण क्षेत्रात राहणार्‍या जनतेला होणार आहे.

Sindhudurg News
Nirphanas Sindhudurg | टोकदार निरफणसाने सर्वांनाच केले चकित; आरोग्यावर परिणाम होणार का? बाजारपेठेत नव्या प्रजातीची चर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news