Sindhudurg ZP scam : जि.प .बांधकाम घोटाळा ! फरार ठेकेदार ओंकार पडते याला हायकोर्टाकडून अटकपूर्व जामिन मंजूर

पोलिस तपासाला धक्का; अजुन ३ जण संशयित अद्याप फरारी
scam
ScamPudhari
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद बांधकाम विभागातील मुख्य कार्यकारी अभियंत्यांची बनावट सही करून ६ लाख ७६ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक घोटाळा करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पाच आरोपींपैकी फरार ठेकेदार तथा अभियंता ओमकार नंदकुमार पडते (रा. कुडाळ) याला उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

scam
Sindhudurg Fort : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्त्व विभागाकडून पाहणी

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या मुख्य कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र सावंत यांच्या सहीचे जानेवारी २०२६ मध्ये बनावटीकरण करण्यात आले होते. विविध सार्वजनिक कामांची देयके व प्रस्ताव सादर करून त्या आधारे थेट सरकारी तिजोरीतून ६ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आरोपींच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात ठेकेदार ओमकार पातडे, ओंकार पडते, मोहन केळुसकर, लक्ष्मण राऊळ व मंदार दामोदर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

scam
Sindhudurg MSRTC news: एसटीचे सिंधुदुर्ग विभागीय वाहतूक अधिकारी निलंबित

सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८, ३३८, ३४० सारखी गंभीर कलमे लावून तपास सुरू केला होता. या प्रकरणातील सर्व आरोपी गुन्हा दाखल होताच फरार झाले होते. खुद्द पालकमंत्र्यांनी यामधील “गॉड फादर” शोधला जाईल, असे जाहीर केले होते. दरम्यान, फरार आरोपींपैकी पडते, पाताडे व केळुसकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन फेटाळला गेला होता. तथापि, काल दिनांक २० जून २०२६ रोजी बॉम्बे हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने यातील ओमकार पडते (रा. कुडाळ) याला प्रथम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आता उर्वरित आरोपींना अटकपूर्व जामीन मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news